गडचिरोली : होप फाऊंडेशन, सिरोंचा या संस्थेच्या वतीने ‘निक्षय मित्र’ म्हणून भामरागड तालुक्यातील ५ गरजू आणि गरीब क्षय रुग्णांना प्रोटीन किटचे वाटप करण्यात आले. होप फाऊंडेशन गेल्या दीड वर्षांपासून जिल्ह्यात अनेक सेवाभावी उपक्रम राबवत आहे.
होप फाऊंडेशन संस्थेच्या वतीने ग्रामीण रुग्णालय भामरागड वैद्यकीय अधीक्षक डॉ. विभुते, वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश कांबळे, भामरागडचे तालुका आरोग्य अधिकारी येथील भूषण चौधरी, प्राथमिक आरोग्य केंद्र आरेवाडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. तिरंनकर, जिल्हा क्षय रोग अधिकारी डॉ गायकवाड, जिल्हा क्षय रोग कार्यक्रम समन्वयक मनीष बोदेले, जिल्हा क्षय रोग पर्यवेक्षक अनिल चव्हाण, तालुका क्षय रोग पर्यवेक्षक अमोल मोडक, औषध निर्माण अधिकारी महादेव वघे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
होप फाऊंडेशन सिरोंचा संस्थेचे संचालक नागेश मादेशी यांच्या अथक परिश्रमातून सदर उपक्रम यशस्वी झाला. ग्रामीण रुग्णालय भामरागड येथील कर्मचारी, जिल्हा क्षयरोग नियंत्रण पथक कार्यालय गडचिरोली येथील कर्मचारी वृंद, आणि होप फाऊंडेशन सिरोंचाचे सर्व पदाधिकारी यांचे सहकार्य यावेळी लाभले.