पुणे : घरेलू कामगार महिलांना शासकीय योजनांची माहिती व्हावी यासाठी ह्युमन पार्क व कोरो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने २८ सप्टेंबर रोजी कार्यशाळा पुण्यात संपन्न झाली. यावेळी अनेक मान्यवर महिलांना शासकीय योजनांबद्दल माहिती देण्यासाठी उपस्थित होते.
जनता वसाहत येथील सांस्कृतिक हॉल येथे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नगरसेविका प्रियाताई गदादे पाटील, समाज विकास विभागाच्या समुह संघटिका जयश्री दातार, घरेलू कामगार युनियन कार्यकर्त्या जया घाडगे, अपर्णा शिर्के तसेच पुणे विद्यापीठ शिक्षण विभाग डॉक्टर गीता शिंदे, सिफार संस्थेचे शंकर सर आदी मान्यवर यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी कोरो इंडियाच्या समन्वयक स्वाती सावंत व ह्यूमन पार्क संस्थेच्या प्रमुख शारदा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. सरकारी योजनांचा लाभ घेण्याकरिता स्वतःची कागदपत्रे स्वतः काढून घेण्यासाठी पुढाकार घेणे. तसेच जास्तीचे पैसे न घालवता सरकारी दरामध्ये कागदपत्रांची पूर्तता स्वतः महिला करण्यास सक्षम होतील या अनुषंगाने कार्यक्रमात चर्चा करण्यात आली. यावेळी योजनांच्या कागदपत्रांची सविस्तर माहिती समजून घेतली.
असंघटित कामगारांची कामगार कल्याण मंडळ येथे नोंद करणे का आवश्यक याबाबत असणारे महिलांचे सर्व प्रश्न यांचे शंका निरसन यावेळी करण्यात आले. घरेलू कामगार महिलांनी या कार्यशाळेस सकारात्मक प्रतिसाद दिला. कार्यशाळेचे सुत्र संचालन संस्थेच्या कार्यकर्त्या आयेशा पठाण आणि जयश्री कलशेट्टी यांनी केले.