नवी मुंबई : कर्तव्य सामाजिक संस्थेच्या वतीने तुर्भे एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशन येथील १५० महिला आणि पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी तुर्भे एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच कर्तव्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सिद्धाराम शिवलिंगप्पा शिलवंत, सह शिवसेना तुर्भे विभाग प्रमुख महेश कोटीवाले, उद्योजक संतोष कानसे तसेच संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते.
देशातील प्रत्येक नागरिक सुरक्षित राहावे यासाठी पोलिस बांधव २४ तास ड्यूटी करतात. कोविड काळात देखील आपल्या परिवारापासून दूर राहून तसेच आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या रक्षणासाठी रस्त्यावर उभे होते. पावसाळा सुरु झाला आहे. पोलीस बांधवांचे आभार व्यक्त करण्याच्या दृष्टीकोणातून त्यांना एक छोटीसी भेट म्हणून रेनकोट देण्यात आल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.