मुंबई : भाकर फाऊंडेशनच्या वतीने गोरेगाव पश्चिम येथील भगतसिंग नगर १, इंदिरा नगर मधील घरेलू कामगारांनी एकत्रित केक कापून आंतरराष्ट्रीय घरेलू कामगार दिन साजरा करण्यात आला. भाकर फाऊंडेशनचे संस्थापक दिपक सोनावणे यांनी यावेळी घरेलू कामगारांना त्यांच्या हक्कासोबत विविध योजने संदर्भात मार्गदर्शन केले तसेच सर्वांना यानिमित्ताने शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाकर फाऊंडेशनचे संस्थापक दिपक सोनावणे, भाकर फाऊंडेशनचे संचालक धनश्री नाईक, आकाश क्षिरसागर, नुपूर लांडगे, मयूर जाधव, दिपक भालेराव, जॉयल डिसुझा, संगिता बोराडे, जयश्री बोबाटे इत्यादी कार्यकर्ते उपस्थिती होते.