महिला दिनाचे औचित्य साधून कोंढवे धावडे येथील हरितारा सोसायटी मधील महिला समूहाने जुने कपडे व वस्तू संकलन अभियानाचे आयोजन केले.
आपणास नको असलेले चांगल्या स्थितीतील कपडे व विविध वस्तू दिलासा या सामाजिक संस्थेस दान करावे. असे आवाहन करण्यात आले होते. त्यास सोसायटी मधील अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भरपूर प्रमाणात कपडे व विविध वस्तू संकलन झाले.
यासाठी रेश्मा भांडारे यांनी यासाठी महत्वाचे योगदान दिले. सामाजिक कार्यकर्ते व उपसरपंच सुमित लिंबोरे व कार्यकर्ते व इतिहास मोडी लिपी अभ्यासक अशोक पाटील यांचे या उपक्रमास विशेष सहकार्य लाभले. दिलासाचे संघटक संतोष जाधव यांनी सर्वांना संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. दर तीन महिन्यांनी असा जुने कपडे व वस्तू कलेक्शन कॅम्प आयोजित करावा असे मत सर्व सभासदांनी मत व्यक्त केले .