मुंबई : यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२१ ची घोषणा करण्यात आली आहे. चव्हाण सेंटरच्या माध्यमातून युवांसाठी सातत्याने सर्जनशील व प्रोत्साहनपर उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून सामाजिक, क्रीडा, उद्योजकता, रंगमंचीय कलाविष्कार व साहित्य या क्षेत्रांतील विविध गुणवंत युवांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
सामाजिक युवा पुरस्कारात सामजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या छाया भोसले (श्रीगोंदा,अहमदनगर) व रवी चौधरी (औरंगाबाद) यांची निवड करण्यात आली आहे. या निवड समितीमध्ये अनिकेत आमटे, प्रा.हमीद दाभोळकर, दीपक नागरगोजे, मुमताज शेख व दीप्ती राऊत यांचा समावेश होता.
या पुरस्कारांसाठी अर्ज स्वीकृती व अंतिम निवड प्रक्रिये पर्यंतचे सर्व कामकाज नवमहाराष्ट्र युवा अभियानचे संघटक नीलेश राऊत व संतोष मेकाले यांनी यशस्वीपणे पार पाडले.
या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण जागतिक पुस्तक दिनी शनिवार दिनांक २३ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११ ते १ यावेळेत रंगस्वर सभागृह, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई -२१ येथे कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. सर्व पुरस्कारांचे स्वरूप रुपये एकवीस हजारांचा धनादेश, सन्मानचिन्ह असे असणार आहे.