बेळगाव : नारायणराव गुंडोजी जाधव सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानच्या वतीने आंबेडकर चौक येथे प्रदूषणमुक्त रंगपंचमी मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात आली. रंगीबेरंगी फुले उधळून उपस्थित नागरिक आजी माजी नगरसेवक, पोलीस अधिकारी यांनी रंगपंचमीचा आनंद लुटला.
कार्यक्रमाच्या सुरवातीस प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष मालोजी अष्टेकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून प्रतिष्ठानच्या उपक्रमांची माहिती दिली. नेताजी जाधव यांनी मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. याप्रसंगी नगरसेवक नितिन जाधव सामाजिक कार्यकर्ते संजय किल्लेकर यांनी शुभेच्छा दिल्या. उपस्थित पोलीस अधिकारी डी. सी. पी. गडादीसाहेब, ए.सी.पी नारायण बरमणी यांनी प्रत्येकाने आपापले सण शांततेत साजरे करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले. प्रदूषणमुक्त रंगपंचमी उपक्रमाचे कौतुक करून प्रतिष्ठानला धन्यवाद दिले.
या कार्यक्रमात मान्यवर सामाजिक कार्यकर्ते गोपाळराव बिर्जे एल आय सीचे घाडी, सतिश गावडोजी, सुधीर कालकुंद्रीकर, प्रभाकर भाकोजी, नगरसेवक रवि साळुंखे, माजी ननगरसेवक विजय भोसले, राजू बिर्जे, मनोहर हलगेकर, सुधा भातकांडे, वर्षा आजरेकर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीधर उर्फ बापू जाधव यांनी आभार मानले.