पुणे : ब्राईट फ्युचर क्लब यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्लास्टिक मुक्त अभियान राबवण्यात आले.
पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाजवळील कुडजे परिसरातील किनार्यावर आलेल्या प्लास्टिक बॉटल, प्लास्टिक पिशव्या, मद्याच्या बॉटल, सर्व प्लास्टिक साधारणपणे दोन तासांत ६ मोठ्या बॅग भरुन कचरा जमा करण्यात आला.
या उपक्रमात ब्राईट फ्युचर क्लब चे होम मिनिस्टर फेम बाळकृष्ण नेहरकर, सिनेअभिनेत्री सायली शिंदे , लायन्स क्लब पुणे गोल्डच्या प्रेसिडेंट कविता मोरे, सामाजिक कार्यकर्त्या संगीता साहनी व तुषार येळवंडे, जुन्नर तालुका मित्र मंडळाचे सचिव नवनाथ नलावडे , आशीर्वाद गार्डन मधील बाळासाहेब डुंबरे, संतोष सोमवंशी सहभागी झाले होते.