सोलापूर : जागतिक महिला दिनानिमित्त संभव फाउंडेशनच्या वतीने देह विक्री करणाऱ्या महिलांना गंगुबाई कठियावाडी हा चित्रपट दाखवण्यात आला. उमा मंदिरच्या चित्रपट गृहात ६५ महिलांनी या चित्रपटाचा लाभ घेतला.
महिला दिनी मान सन्मान गोष्टी बाजूला सारून त्यांनी काही तास स्व:ताला मोठ्या स्क्रीनवर पाहिले. काहींनी तर अनेक वर्षांनी चित्रपट गृहात पाय ठेवले होते. आपल्या रेड लाइट जगण्याला कुणी तरी चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न करतोय या विचाराने त्या भावूक झाल्या होत्या. सोलापूरच्या या देह विक्री करणाऱ्या वारांगनाना संभव फाउंडेशन टिम आपली वाटते यातच आम्हाला आनंद आहे. अशा भावना यावेळी संभवच्या अतिशने व्यक्त केल्या.
देहविक्री करणाऱ्या वारांगनाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या क्रांती महिला संघाच्या रेणुका जाधव, संभव फाउंडेशनचे अध्यक्ष आतिश कविता लक्ष्मण, कार्याध्यक्षा अस्मिता गायकवाड, उपाध्यक्ष आकाश बनसोडे, संतोष महाराज, गौतम गवळी आदींनी यासाठी परिश्रम घेतले.