औरंगाबाद : महाराष्ट्र दिनानिमित्त ग्रुप ग्रामपंचायत व जिल्हा प्राथमिक शाळा शहापूर येथे चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कॅच द रेन फेस टू या विषयावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत ११० विद्यार्थी सहभागी झाले होते.
गंगापुर तालुक्यातील शहापूर येथे जलशक्ती मंत्रालय भारत सरकार, नेहरू युवा केंद्र औरंगाबाद व राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय सामाजिक व शिक्षण संस्था शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रथम क्रमांक ऋतुजा शिंदे, द्वितीय क्रमांक वैष्णवी शिंदे तर तृतीय क्रमांक प्रांजल शिंदे यांना मिळाला. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
या प्रसंगी ग्रामसेवक दिवेकर, ग्रामपंचायत सदस्य जनार्धन गवारे, उपसरपंच विनायक आळंदकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामनाथ पाटील आळंदीकर, शालेय समिती सदस्य राजेंद्र शिंदे, वाळुंजे, महेश लोंढे, रासकर, बोरकर, साळवे, आवटे,बाविस्कर, अंगणवाडी ताई पुष्पाताई जाधव, पद्माताई शिंदे, आशा कार्यकर्ती कमल शिंदे, वैशाली आळंदकर, नाना आळंदकर, भाऊसाहेब पाटील भराड, दिलीप शिंदे, भाऊसाहेब पाटील गवारे, मसू पाटील आळंदकर, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचाल शरदकुमार शिंदे यांनी केले तर आभार साळवे यांनी केले.