पुणे : समाजात राहणारी १८ वर्षांखालील मुले रागाच्या भरात नकळत किंवा कोणाच्या तरी प्रभावाखाली येऊन खून, चोरी सारखे गंभीर गुन्हे करत असतात. अशा मुलांना कायद्याच्या भाषेत बालगुन्हेगार समजले जाते. या मुलांमध्ये सुधारणा किंवा बदल करण्यात यावा, यासाठी अल हैदरी चैरिटेबल ट्रस्ट च्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते खिसाल जाफरी आणि अन्य मान्यवरांनी बालसुधारगृहातील मुलांना गुन्हे करू नये यासाठी सल्ला, मार्गदर्शन आणि प्रबोधन केले. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवर आणि मुलांसोबत इफ्तार करण्यात आला.