• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
Monday, February 9, 2026
NGO खबर
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
Monday, February 9, 2026
NGO खबर
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

‘अंनिस’च्या वतीने वारसा संतांचा अंधश्रद्धा, निर्मूलनाचा प्रबोधन यात्रेचे आयोजन

NGO ख़बर by NGO ख़बर
May 14, 2022
in सामाजिक उपक्रम
0
‘अंनिस’च्या वतीने वारसा संतांचा अंधश्रद्धा, निर्मूलनाचा प्रबोधन यात्रेचे आयोजन

सांगली : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती समाज सुधारकांचा कृतिशील व विवेकी वारसा पुढे नेणारी चळवळ आहे. महाराष्ट्रातील सर्व जनतेस संतविचार आणि अंधश्रद्धा निर्मूलन या विषयी जनप्रबोधन व्हावे यासाठी, समितीच्या वतीने सांस्कृतिक अभिव्यक्ती विभाग, विविध उपक्रम विभाग व विवेक जागर संस्था आयोजित १४ ते २३ मे या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये वारसा संतांचा अंधश्रद्धा, निर्मूलनाचा या नावाने संपूर्ण महाराष्ट्रभर जनप्रबोधन यात्रा निघणार आहे.

यामध्ये प्रामुख्याने थोर राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या जन्मभूमी सेनगावपासून या प्रबोधन यात्रेची सुरुवात होणार असून शनिवार १४ मे रोजी सेनगाव, मोझरी, मुक्‍ताईनगर, निफाड, त्र्यंबकेश्वर, आळंदी, देहू, पिंपळनेर, सासवड, श्रीगोंदा, आपेगाव, पैठण, दौलताबाद, नरसी नामदेव, गंगाखेड, परळी, तेर, आरण, मंगळवेढा मार्गे जाऊन पंढरपूर येथे २३ मे रोजी समारोप होणार आहे. या संपूर्ण प्रबोधन यात्रेमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर व संविधान प्रचारक सुभाष वारे हे आपल्या परंपरेतील समतावादी संतांचे कार्य, विचार व त्यांनी चालवलेली मानवतावादी चळवळ याविषयी प्रबोधन करणार आहेत. या प्रबोधन यात्रेचे अभियान प्रमुख म्हणून
हरिदास तम्मेवार, मनोहर जायभाये, हनुमंत मुंढे हे समन्वय करणार आहेत.

या यात्रेचे संयोजक म्हणून नितीन राऊत व अनिल शोभना वसंत हे करीत आहेत. तरी या प्रबोधन यात्रेत बहुसंख्येने सहभागी असे आवाहन राज्य कार्यकारी समिती महाअंनिस व विवेक जागर संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

संभाव्य पुरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मदत करणाऱ्या सामाजिक संस्थांची स्वतंत्र यादी करावी – डॉ. निलम गोऱ्हे

Next Post

पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे अग्निसुरक्षा प्रशिक्षण संपन्न

Please login to join discussion

Categories

  • Business, Small Business (1)
  • CSR (83)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (262)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (119)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)

2

NGO Khabar

©2021- 2024 NGO Khabar. All Rights Reserved

Navigate Site

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

©2021- 2024 NGO Khabar. All Rights Reserved