पुणे : अनुभव शिक्षा केंद्रातर्फे पुणे जिल्ह्याची एकदिवसीय संविधानिक मूल्ये कार्यशाळा जनता हॉल, जनता वसाहत, पर्वती पायथा येथे संपन्न झाली. सोमवार दि. १६ मे रोजी झालेल्या या कार्यशाळेत संविधान निर्मितीचा इतिहास व संस्कृतीचा संविधानावर झालेला प्रभाव, कोणतीही व्यवस्था सुरळीतपणे सुरु राहण्यासाठी नियमांची गरज असते हे समजून घेतले. यामध्ये चर्चा करताना सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या कार्यशाळेमध्ये भारतीय संविधानाची प्रस्ताविका, त्यातील मूल्य आणि त्या मूल्यांचा आपल्या जगण्याशी असलेला संबंध समजून घेतला. यावेळी अनुभव शिक्षा केंद्राची पुणे शहर कमिटी स्थापन करण्यात आली. या कमिटीमध्ये कार्यवाह- अजय बनसोडे; सहकार्यवाह – चैतन्य जाधव; संघटक – पूजा सोनावणे
सहसंघटक – नाना पवार; सहसंघटक – सचिन गुप्ता; तसेच सदस्य- गुरुकिरण झोमबांडे, रोहन धुमाळ, अभिजित क्षीरसागर, नेहा कसबे, गणेश वाघमारे, अनुज जकाते, दिपाली भालेराव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या कार्यशाळेसाठी प्रशिक्षक म्हणून सरस्वती शिंदे व स्वप्निल मानव हे उपस्थित होते. कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी दिगंबर बिराजदार यांनी कमिटी मधील सदस्यांचा स्वागत केले व सदिच्छा दिल्या.