अंबाजोगाई : आंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे कार्य हे सामाजिक बांधीलकी व सामाजिक भावना जोपासणारे असते अशी भावना अंबाजोगाई शासकीय रक्तपेढी विभागाचे विभागप्रमुख डॉ. बगाटे यांनी व्यक्त केली. ते अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या वतीने आयोजित कोरोना योद्धा सन्मान व सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते . यावेळी व्यासपीठावर राजकिशोर मोदी, डॉ बगाटे, डॉ. शीला गायकवाड, संतोष शिनगारे, गोविंद पोतंगले, आदीजण उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी योगेश्वरी देवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमात बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सत्कार समारंभाची कल्पना आणि कोरोना काळात अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या व राजकिशोर मोदी मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित उपक्रमाची माहिती दिली. कोरोना काळात दर आठवड्यात ३० ते ४० रक्तदाते रक्तदान करत होते. एकूण ११०० रक्तदात्यांनी रक्तदान करून रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न केले. यापुढेही असेच कार्य अविरतपणे चालू ठेवण्याचा निर्धार राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केला.
आपल्या अध्यक्षीय समारोपात रक्तपेढी विभाग प्रमुख डॉ. बगाटे यांनी राजकिशोर मोदी यांनी सुरू केलेले सर्व उपक्रम हे सामाजिक बांधिलकी व भावना जोपासन्यासाठीच असतात असे गौरवोद्गार काढले. कोरोना काळात आई वडिलांना त्यांच्या मुलांनी वाऱ्यावर सोडले. मात्र डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली. त्यांना मोलाची साथ ही राजकिशोर यांच्यासारख्या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या नेत्यांनी दिली असे मत डॉ. बगाटे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत कांबळे यांनी तर आभार विजय रापतवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील व्यवहारे, महेश वेदपाठक आदींनी परिश्रम घेतले.











