पुणे : स्त्री मुक्ती संघटना, जिज्ञासा प्रकल्प व समुपदेशन केंद्रामार्फत जनता वसाहत या वस्तीतील महिलांसाठी व पुरुषांसाठी ‘व्यसनाधीनता व मानसिक आरोग्य’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील निशिकांत प्रधान व हेमेन्द्र चोनकर यांनी उपस्थित महिलांना व पुरुषांना मार्गदर्शन केले. एकूण २४ जणांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.
या सेशन मध्ये व्यसन म्हणजे काय, व्यसनाचे प्रकार व व्यक्ती व्यसनामध्ये कसा ओढला जातो. त्याचे व्यक्तीच्या जीवनावर कसा परिणाम होतो व यातून बाहेर पडण्यासाठी कोणते उपाय याबद्दल माहिती देण्यात आली. तसेच व्यसनाचे शरीरावर, मनावर, व कुटुंबावर काय परिणाम होतात. समाजाचा व्यसनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो यावर विस्तृतरित्या मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित लोकांच्या प्रश्नांना मार्गदर्शकांनी समर्पक उत्तरे देऊन प्रश्नांचे निरसन केले. संघटने तर्फे स्वप्नाली लावंड, रोहित कांबळे, श्रावस्ती गाडे, संदिप निकम, निर्मला खैरे आणि अमित घाडगे उपस्थित होते.