पुणे : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त नवभारत प्रतिष्ठान रावगाव व राजीव गांधी सार्वजनिक वाचनालय रावगाव यांच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ नागरिक व माजी ग्रामपंचायत सदस्य नामदेव शेळके व रहेमान शेख यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यानिमित्ताने महिलांसाठी मोफत ई-श्रम कार्ड वाटप करण्यात आले. प्रतिष्ठान व ग्रंथालयामार्फत मोफत ई-श्रम कार्ड वाटपाचा हा दुसरा टप्पा असून यापुढेही खास महिलांसाठी मोफत ई-श्रम कार्ड काढून देणार असल्याची घोषणा करण्यात आली.
यावेळी नामदेव शेळके, रहेमान शेख, महादेव बुधवंत, माणिक शिंदे, सुभाष काळे पाटील, रामदास पवार, किरण पवार, अक्षय पवार, शामल पवार, पोपट बुधवंत, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश कांबळे, राहुल पवार यांनी परिश्रम घेतले. तर सर्व उपस्थितांचे आभार भास्कर पवार यांनी मानले.