सातारा – फलटण : आरोग्य सेवेपासून वंचित असणाऱ्या गरीब गरजू नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप व अल्प दरात शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
मॅग आणि माऊली फाऊंडेशन संचालित जनसेवा डायग्नोस्टिक सेंटर आणि लायन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात २७० नेत्र रुग्णांनी लाभ घेतला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जगन्नाथप्रसाद पटनाईक CGO बँक ऑफ महाराष्ट्र व मोनिका कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच लायन्स क्लबचे अध्यक्ष घाडगे, माऊली फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष अँड. विश्वनाथ टाळकुटे, मॅग मल्टिस्टेटच्या CGM शलाका मोहोटकर, मॅग फिनसर्वे कंपनीचे चेअरमन अनंता मोहोटकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
वयोवृद्ध लोक पैशांच्या अभावी, गरिबी, महागाई, आरोग्याविषयी जागृत नसणे इत्यादी कारणांमुळे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांचे आरोग्य चांगले रहावे व योग्यवेळी योग्य निदान होणे गरजेचे असल्याचे ओळखून संस्थेतर्फे लोकांचे हिताचे विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी राजेंद्र कुंभार (डेप्युटी इंजिनिअर), डॉ. दिव्या रसाळ, विलास रसाळ, सचिन अहिवळे ( मॅग मल्टीस्टेटचे मॅनेजर ) तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.