सांगली : विठ्ठल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि आय.सी.यू. सेंटर, येळवी यांच्या मार्फत सर्वरोग निदान व मोफत औषधोपचार शिबिर संपन्न झाले. या शिबिरामध्ये २०० रूग्णांची तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाघाटन येळवी गावचे उपसरपंच सुनिल अंकलगी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ओंकार स्वरूपा फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष दिपक (आण्णा) अंकलगी, ग्रा.पं. सदस्य संतोष पाटील, सचिन माने, येळवी सर्व. सेवा. सह. सोसायटी चेअरमन संतोष स्वामी, डॉ. विकास पाटील,डॉ. राम्याश्री एच.जी, डॉ. सचिन वाघ, डॉ.सुनिल वणकुंद्रे, डॉ. विवेक स्वामी, डॉ. निलेश माने, विलास मालगत्ते, शशिकांत गानमोटे, आनंदा क्षीरसागर, TBM न्युजचे संतोष पोरे, दै. केसरीचे गजानन पतंगे आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
डॉ. सचिन वाघ म्हणाले आता वेगवेगळ्या आजारावरती सांगली-मिरजेला जाण्याची आवश्यकता नसून विविध आजारावरती विठ्ठल मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल जत येथे निदान करण्यात येणार आहे. हॉस्पिटल मधील उपलब्ध विभागाबद्दल तसेच उपलब्ध सुविधा बद्दल या वेळी त्यांनी माहिती दिली. जतमध्ये प्रथमच अत्याधुनिक सर्व सेवा नियुक्त सुसज्ज हॉस्पिटल जत करांच्या सेवेसाठी १३ जून पासून उपलब्ध होणार असल्याचे डॉ. वाघ यांनी सांगितले.