सोलापूर : राजीव गांधी सार्वजनिक वाचनालय रावगाव, तालुका करमाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक अनिल काळोखे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली. अनिल काळुंखे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या गड किल्यांबद्दल माहिती सांगून राजेंच्या कार्यावर प्रकाशझोत टाकला. यावेळी भरत धगाटे, प्रशांत शिंदे, भाऊसाहेब बुधवंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी वंजारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक अनिल काळोखे, महात्मा गांधी विद्यालयाचे प्राध्यापक भाऊसाहेब बुधवंत, समता परिषदेचे तालुका अध्यक्ष प्रशांत शिंदे ,नगर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक संतोष आवटे, माजी मुख्याध्यापक दत्तात्रय कानडे, माणिक शिंदे ,पोपटबुधवंत, दत्तू शिंदे, रामदास शिंदे ,राजेंद्र पवार, राजेंद्र कोळेकर ,सुभाष काळे पाटील, धगटवाडी जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरत धगाटे, राहुल पवार, प्रकाश कांबळे, दादा पवार, वाचनालयाचे सचिव भास्कर पवार आदी उपस्थित होते. आभार भाऊसाहेब बुधवंत यांनी मांनले.