सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये श्रीनिवास पाटील फाऊंडेशनच्या वतीने युवा ३६०° उपक्रम मार्गदर्शन व इंटर्नशिप निवड प्रक्रिया कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा रचनाताई पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग व प्रतिसाद नोंदविला.
युवकांनी, युवकांसाठी व युवकांकडून राबविला जाणारा हा उपक्रम त्यांच्या सक्षमीकरण व कौशल्ये विकासासाठी राबविला जातो. युवा ३६०° इंटर्नशिपमार्फत विविध उपयुक्त कौशल्य प्रशिक्षण, पाठबळ व प्रोत्साहन व कार्यानुभवासाठी फाऊंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग विद्यार्थ्यांचा असतो.
यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. ए. सी. अत्तार सर, कॉलेजच्या डीन डॉ. शबीना मोदी, डॉ. एस. के. शेख, राजेंद्र पाटील तसेच फाउंडेशनचे कार्यकर्ते विकास साळुंखे, अनुसया पाटील, युवा ३६०°चे कार्यकर्ते प्रविण कोळपे, अंकिता थोरात, नेहा जगताप, प्रशांत यादव, रुचिता जाधव, वृषाली पवार आदींचे सहकार्य लाभले.