चंद्रपूर : संकल्प बहुऊद्देशीय ग्राम विकास संस्थेच्या वतीने लिंक वर्कर प्रकल्पा अंतर्गत एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र, ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने किन्ही येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा ५२ लाभार्थ्यांनी लाभ घेतला.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था यांच्या सूचनेनुसार व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, सामान्य रुग्णालय, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली लिंक वर्कर प्रकल्पाद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील गावांमध्ये विविध गटातील नागरिकांना एचआयव्ही/एड्स, क्षयरोग व गुप्तरोग या आजारा बाबत मार्गदर्शन व तपासणी शिबिरे आयोजित केली जातात.
ग्रामीण भागातील प्रत्येकाला एचआयव्ही विषाणू बद्दल माहिती व्हावी, तसेच हा विषाणू शरीरात प्रवेश करण्याची कारणे, आजाराची लक्षणे, उपचार पद्धती या सर्व प्रकारची माहिती पोहचविण्याचे कार्य लिंक वर्कर प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी पळसगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन गायकवाड (सि.एच.ओ.), लिंक वर्कर पर्यवेक्षिका रुपाली मडावी, एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र, प्रयोगशाळा तंत्रज्ञ स्मिता काकडे, रेखाताई इसनकर (आशा प्रवर्तिका ) संगीता आलाम (आशा कार्यकर्त्या ) तसेच लिंक वर्कर श्रुती मॅडम उपस्थित होत्या.
सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी आयसीटीसी समुपदेशक सचिन तल्लार व लिंक वर्कर प्रकल्पाचे डीआरपी रोशन आकुलवार यांचे मार्गदर्शन लाभले.