पालघर : शैक्षणिक साहित्यांपासून गरीब विद्यार्थी वंचित राहू नये या उद्देशाने अस्तित्व सामाजिक विकास संस्थेच्या वतीने आदिवासी भागांतील जि.प. शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. जव्हार तालुक्यातील अती दुर्गम भागातील कौलाळे ग्रामपंचायत मधील कुंभारखांड येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.
जव्हार तालुक्यातील विविध जि.प. शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल, पट्टी, स्केचपेन, खोडरबर, रंगखडू, इत्यादी मोफत शैक्षणिक साहित्य मिळावे या उद्दशाने अस्तित्व संस्थेने हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ जि.प. शाळा कुंभारखांड, ता. जव्हार, जि. पालघर येथून दिनांक १८ जून पासून करण्यात आला.
या उपक्रमाप्रसंगी अस्तित्व सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष अंकुश वळवी, सचिव, सचिन कोरडे. खजिनदार. योगेश कचरे, सदस्य. मनोज जाधव. जगदीश बांबेरे, संदीप चारस्कर, महेंद्र गवारी उपस्थित होते, तसेच या उपक्रमा प्रसंगी जि.प. शाळेचे शिक्षक पिलाना सर व राथड सर यांचे सहकार्य लाभले.