भंडारा : जागतिक योग दिनानिमित्त महा एनजीओ फेडरेशन महाराष्ट्र, हितेंजु बहुद्देशीय संस्था व महिला पतंजली योग समिती तुमसर यांच्या संयुक्त विद्यमाने वाजपेयी क्रीडासंकुल तुमसर येथे योग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अनुप कोरडे, प्रमुख पाहुणे उषा जावले आणि रीमती साधना मेश्राम यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
योग शिबिराला लाभलेल्या महिला पतंजली योग समिती तालुका प्रभारी व फुलराणी बाल संस्कार, योग केंद्राच्या अध्यक्षा सविताताई कडव यांनी योग, प्राणायम, योगाचे अनेक प्रकार आणि आसने यांचे प्रशिक्षण आणि योग संदेश दिला. योग कर्मस कौसल्म! कर्मातील कौशल्य म्हणजेच योग होय. शेवटी प्रत्येक माणसाची धडपड ही सुख, आनंद मिळवण्यासाठीच आहे. आनंद हे अंतिम ध्येय आहे. आनंद हा भौतिक येहिक सुखातून मिळत नाही त्याकरिता योग करा निरोगी रहा असा संदेश सर्व जगात देऊ असे प्रतिपादन हितेंजु संस्थेचे धमलेश सांगोडे यांनी केले. आजादी का अमृत महोत्सव म्हणून ७५ संस्थेसोबत महा एनजीओने योगा कार्यक्रम घेतले.
याप्रसंगी हितेंजु संस्थेचे सचिव धमलेस सांगोडे, पतंजली महिला आयोग समिती महामंत्री स्वाती हरडे, लायन्स अध्यक्ष अर्चना डुंबरे, लायन्स अध्यक्षा शिवानी जोशी, वरुणा दुर्वे, श्रीमती शोभा लांजेवार, श्रीमती चेतना घाटबांदे, बबीता तीतिर्मारे, छायाताई कटरे, श्रीमती शोभा नावडकर, सुषमा धबाले, विना रामटेके, रंजना ढबाले इत्यादींचे सहकार्य लाभले.