पुणे : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने वस्ती पातळीवर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. ग्रीनतारा फाऊंडेशनने गांधी नगर व जयप्रकाश नगर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात तसेच पाटील इस्टेट शिवाजीनगर येथे मार्गदर्शन आणि चर्चासत्रांमधून मुलांमध्ये जनजागृती करण्यात आली.
या जनजागृती कार्यक्रमामध्ये मुलांना अमली पदार्थ म्हणजे काय? त्याचे प्रकार, कारणे, परिणाम, एनडीपीएस (NDPS) कायदा तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत माहिती आणि सविस्तर चर्चा करण्यात आली. मनोदय व्यसनमुक्ती संस्थेचे संचालक डॉ. विष्णू श्रीमंगले आणि समुपदेशक अक्षय कदम यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने व्यसन सोडण्याची इच्छा असलेल्या सर्व लोकांना मदत केली जाते. वस्ती पातळीवर १३-२२ वयोगटातील मुलां-मुलींनी व्यसनी होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांच्या मानसिक, शारीरिक, बौद्धिक विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात.
संचालक डॉ. विष्णू श्रीमंगले