पालघर : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने ७२०० पोलीस भरतीच्या जागांसाठी मोफत भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. वाडा तालुक्यातील जिजाऊ कन्स्ट्रक्शन ऑफिस येथे हे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले असून याचा फायदा अनेक तरुणांना होणार आहे.
या प्रशिक्षण केंद्राचा उद्घाटन सोहळा निलेश सांबरे व दशरथ पाटील (पोलीस निरीक्षक,पोलीस स्टेशन वाडा) यांच्या हस्ते पार पडला. पोलीस होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या अतिशय जिद्दी, मेहनती, कष्टाळू तरुणांचे भविष्य घडविण्यासाठी व त्यांच्या पंखांना बळ देऊन त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी हे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आल्याचे संस्थेचे वतीने सांगण्यात आले. यावेळी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महिला सक्षमीकरण पालघर जिल्हा प्रमुख, हेमांगीताई पाटील, प्रमुख अतिथी आणि पोलीस बंधू उपस्थित होते.