फोटो क्रेडिट – संविधान प्रचारक फेसबुक पेज
पनवेल : भारतीय संविधानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी संविधानाचे चांगले प्रचारक घडावेत यासाठी पनवेल येथे दोन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संविधान प्रचारक टीमच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे शिबीर १३ व १४ ऑगस्ट रोजी युसुफ मेहेरअली सेंटर, तारा पनवेल येथे पार पडणार आहे.
भारतीय संविधानातील मूल्यांच्या आधारावर भारतीय समाज तयार व्हावा म्हणून ‘संविधान प्रचारक’ हे संविधानातील मूल्यांच्या प्रचार व प्रसाराचे काम करीत आहेत. या शिबिरात सहभागी होण्यासाठी
आयोजकांच्या वतीने गुगल फॉर्म देण्यात आला आहे. इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांना हा फॉर्म ८ ऑगस्ट पर्यंत भरता येणार आहे.
शिबिरासाठी फक्त १०० जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. सहभागी होण्यासाठी गुगल फॉर्म :
https://forms.gle/nn3tmeizZNtevnfVA