बारामती : मुलाच्या वाढदिवसाचा वायफट खर्च टाळून सुरवडी पावरमळा येथील पवार कुटुंबाने स्तुत्य उपक्रम राबवला. सुरवडी येथील माधुरी व प्रशांत पवार यांचा मुलगा समर्थ याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त वायफट खर्चाला फाटा देऊन जिल्हा परिषद शाळेतील २०० विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिलसह शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
वाढदिवसाला इतर वायफट खर्च न करता सामाजिक बांधिलकी जपत शालेय विद्यार्थ्यांना केलेल्या साहित्य वाटपामुळे पवार कुटुंबीयाचे कौतुक होत आहे. यावेळी सुरवडी गावचे उपसरपंच दीपक साळुंखे पाटील, पोलीस पाटील संतोष पवार, ग्रामपंचायत सदस्य संतोष साळुंखे, संदीप सगरे, शाळेच्या मुख्याध्यापिका कुंभार आर. एस, शिक्षिका सहस्त्रबुद्धे एस एस, कुंभार एल आर, चव्हाण ए. पी., पाटणे एस एस, पानसरे एस एस, नेताजी साळवे, रामदास पवार रणजीत साळवे, दीपक पन्हाळे, नितीन जाधव, अर्जुन माडकर, निवृत्ती वाघ, राजेंद्र पवार, काकासो पवार, दीपक पवार, योगेश पवार, सूर्यकांत पवार आदी उपस्थित होते.