सोलापूर : श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने ७५ वर्षाच्या जेष्ठ नागरिकांना औक्षण करत राख्या बांधून अनोख्या पध्दतीने रक्षा बंधन अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला. प्रतिष्ठानच्या वतीने यंदाही वैशिष्ट्यपूर्ण रक्षाबंधनाची परंपरा जपली आहे.
प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी अनोख्या पध्दतीने रक्षा बंधन सण साजरा केला जातो. यापूर्वी एसटी बसचे वाहक-चालक, पोस्टमन काका, रेल्वेचे टीसी व ट्रकचालक किन्नर अशा विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना राखी बांधण्यात आल्या होत्या. दरम्यान, यंदा ७५ वा स्वातंत्र्य महोत्सवानिमित्त ७५ वर्षाच्या जेष्ठ नागरिकांसाठी रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विशेष म्हणजे “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव”चा लोगो असलेली राखी बांधण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर शहर माहेश्वरी महिला संघटनचे कोषाध्यक्ष निलकमल बलदवा, शिक्षिका शशिकला रामपुरे, श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान महिला अध्यक्षा अक्षता कासट आदी मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन नर्मदा कनकी यानी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती कासट, रुपा कुत्ताते, माधुरी चव्हाण, शुभांगी लचके, रुचा चव्हाण, शिला तापडिया, भारती जवळे, प्रियंका जाधव, प्रंजाली मोहीकर, केशव भैय्या, अविनाश जिनकेरी, रविंद्र गोयल, आकाश लखोटिया, दिनेश मंत्री, सुरेश लकडे, श्रीपाद सुत्रावे, शिरीष जाधव आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानने जपलं सामाजिक भान : माजी प्राचार्य मेने
याप्रसंगी माजी प्राचार्य प्रेमचंद मेने म्हणाले, श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपणारा हा कार्यक्रम आयोजित केला. हे बघून माझं मन भरून आले. अमृतमहोत्सवा निमित्ताने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या जेष्ठ नागरिकांचा फेटा बांधून औक्षण करत राख्या बांधून अनोख्या पध्दतीने रक्षा बंधन सण साजरा करण्यात आला. “देऊ वंचितांना मान, जपू सामाजिक भान” हे ब्रीद कार्यातून सार्थक केले आहे. हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगत प्रतिष्ठानच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.