पुणे (जुन्नर) : राजुरी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमात संकल्प संस्थेचा विशेष सामाजिक योगदानाबाद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष कलीम पटेल व उपाध्यक्ष जीलानी पटेल यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या कार्यक्रमाला जुन्नर तालुक्याचे लोकप्रिय आमदार अतुल बेनके, तहसीलदार सबनीस, ग्रामनेते दीपक औटी, सरपंच प्रियाताई हाडवले, उपसरपंच माऊली शेळके, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, सर्व संस्थांचे आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायत राजुरी यांनी संस्थेच्या कार्याची दखल घेऊन विशेष सामाजिक योगदान पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मुख्य प्रवर्तक हाजी गुलाम नबी शेख व सर्व पदाधिकारी यांनी आभार व्यक्त केले.
संकल्प संस्थेचे मुख्य प्रवर्तक हाजी गुलामनबी शेख यांच्या नेतृत्वाखाली सन २०१४ पासून नियमितरित्या सामाजिक , शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात विविध उपक्रम राबविले जात असून त्यामध्ये संकल्प अन्नपूर्णा केंद्र, संकल्प स्पोर्ट्स अकॅडमी, संकल्प करिअर क्लासेस, जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा इत्यादी उपक्रमांचा समावेश आहे.