पिंपरी चिंचवड : आपला परिसर नियमित स्वच्छ आणि सुंदर करत नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणाऱ्या स्वछता दूताना आपुलकी आणि आपलेपणाची राखी बांधत रक्षाबंधन साजरे करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी व नगरसेविका करुणाताई शेखर चिंचवडे यांचे संयुक्त विद्यमाने अनोखे रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी परिवारातील महिलांकडून चिंचवड विभागातील आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी यांना राखी बांधून मिठाई देऊन रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे कार्यक्रमासाठी राख्या खास रावेत येथील महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवल्या होत्या.
यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी एम.एम. शिंदे, नगरसेविका करुणाताई चिंचवडे, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी चे प्रेसिडेंट गणेश बोरा, फर्स्ट लेडी रेश्मा बोरा,
रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर सुभाष जयसिघानिया, रो. राजेंद्र चिंचवडे, रो.वसंत ढवळे, रो.अश्विनी खोले, रो. स्वाती वाल्हेकर, सामाजिक कार्यकर्त्या आशाताई चिंचवडे, शेखर चिंचवडे युथ फौंडेशनचे सचिन काळभोर आदी उपस्थित होते.
रो. अश्विनी खोले ह्यांनी प्रास्ताविक केले तर रेश्मा बोरा ह्यांनी सूत्रसंचालन केले. रो. राजेंद्र चिंचवडे ह्यांनी उपस्तीत मान्यवरांचे आभार मानले.