पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवी वर्षा निमित्त मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने पाटील इस्टेट, गांधीनगर, जयप्रकाश नगर, नागपूर चाळ इथे विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. या तिन्ही केंद्रामधून एकूण ११४ विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्साहाने सहभाग नोंदविला. मनोदय व्यसनमुक्ती संस्था ही वस्ती पातळीवर तरुण पिढी व्यसनी होऊ नये म्हणून कार्य करत आहे.
१४ ऑगस्ट रोजी वस्ती पातळीवर मेहेंदी, रांगोळी, हस्ताक्षर, वकृत्व, गायन, कविता लेखन अश्या विविध स्पर्धा घेतल्या गेल्या. या स्पर्धा घेण्यामागचा मुख्य उद्देश विदयार्थ्यांना त्यांचे सुप्त कलागुण समजावेत, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि नावीन्यपूर्ण विचार क्षमतांचा वाव मिळावा हा होता.
या स्पर्धेला परीक्षक म्हणून अलका निकम, धर्मा पडाळकर, डॉ. नंदा अनिलकुमार मुने, ग्रीनतारा फौंडेशन यांनी जबाबदारी सांभाळली आणि आवश्यक मार्गदर्शन केले. स्वातंत्र्यदिनाच्या व बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लोकमत चे उपसंपादक उद्धव धुमाळे, पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशनच्या संचालिका नेहा महाजन, गांधीनगर, येरवडा येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष सुकाळे यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या वेळी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अनुभवांचे कथन करत मनोदयमुळे त्यांचा दैनंदिन आयुष्यात काय फरक झाला ते सांगितले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे स्व-रचीत कविता, देश भक्तीपर गीते आणि नृत्य सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोदय व्यसनमुक्ती संस्थेचे पदाधिकारी प्रज्ञा जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रतीक्षा हावळे यांनी केले. या प्रसंगी मनोदय संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. विष्णु श्रीमंगले, या कार्यक्रमाच्या समन्वयक मैत्रेयी पाध्ये, समुपदेशक अक्षय कदम, समृध्दी साळवी, सुदर्शन चकाले उपस्थित होते.