स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि शाहिद दाभोलकर स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शिवाजीनगर शाखेचा उपक्रम
पुणे : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिवाजीनगर शाखेने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात ६२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाला एस.एम.जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनने विशेष सहकार्य केले.
यावेळी संजय बनसोडे, डॉ. प्रदीप आवटे, गोपालदादा तिवारी, सचिन माळी, शीतल साठे, मनीषा गंपले, कमलादेवी आवटे, धमेन्द्र सातव, उपेंद्र टन्नू, प्रकाश पवार आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली. विनोद खरटमोल, अरिहंत अनामिका, नम्रता ओव्हाळ, सदाशिव फाळके, माधुरी गायकवाड, अक्षय दावडीकर, परिक्रमा खोत, वनिता फाळके, घनश्याम येणगे, रविराज थोरात, भीमराव येरगे, सचिन माने, रविकिरण काटकर, सम्यक वि म, मुकेश रजपूत, प्रेमा फाकटकर, रोहित घोगरे, रुपेश जगताप, आकाश छाया, लालचंद कुंवर, मयूर पटारे, स्वप्नील भोसले, संदीप कांबळे, विशाल विमल, ओंकार विधाते, स्नेहा चामले, निखिल मोरे, पूनम जाधव, सतीश जाधव, श्वेता पाटील, उमेश कामठेवाड, आरजू तांबोळी, अश्विनी गायकवाड आदी कार्यकर्त्यांच्या सामूहिक प्रयत्नातून शिबीर यशस्वी झाले.