‘युवा है हम, इंडिया’ हा युथ प्लॅटफॉर्मच्या वतीने ‘कोलाज’ या निवासी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ५, ६ आणि ७ नोव्हेंबर रोजी हि कार्यशाळा संपन्न होणार असून १८ ते २५ वयोगटातील तरुण तरुणींना या कार्यशाळेत सहभागी होता येणार आहे. कार्यशाळेसाठी नोंदणी आवश्यक असून १३ आक्टोबर पर्यंत नोंदणी करण्याची अंतिम मुदत असणार आहे.
‘कोलाज’ कार्यशाळेविषयी संयोजक निलेशकुमार शीला नामदेव यांनी सविस्तर माहिती दिली आहे
आजमितीला सामाजिक परिस्थितीचा विचार केला असता २१ व्या शतकात जगत असताना आपल्यापूढे नानाविध समस्या आणि वेगवेगळ्या संधिग्धता आ वासून उभ्या आहेत. त्यात आपल्या आजूबाजूला सतत कार्यरत असलेल्या प्रक्रिया आपल्या सगळ्यांच्याच जीवनाला प्रभावीत करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात प्रभावीत होत आहे. त्याची काही कारण आपण जाणतो आणि काही कारण अजून ही आपण समजू शकलो नाहीत. अशा विविध कारणांचा, शक्यतांचा शोध घेणं अनिवार्य होत चालल आहे.
असाच एक प्रयत्न ‘कोलाज’ या कार्यशाळेच्या माध्यमातून ‘युवा है हम, इंडिया’ हा युथ प्लॅटफॉर्म करणार आहे. या कार्यशाळेमध्ये सहभागी विविध तरुण स्वतःला आणि सभोवताली घडणाऱ्या घटनांना समजुन घेण्याचा प्रवास एकत्र अभ्यासणार आहोत. जगण्याच्या आणि व्यक्त होण्याच्या पद्धती त्यामागे असणारी विविध कारणे, आजुबाजुच्या परिस्थितीला आपल्याकडून दिला जाणारा प्रतिसाद आणि त्यातुन होणारी आपली वैचारिक आणि भावनिक जडण घडण, समाजामध्ये अपेक्षित बदलाचं आपलं स्वप्नं समजून घेण्याचा प्रयत्न होणार आहे.
या कार्यशाळेमध्ये मानवी जीवनातील भय, पर्याय, परिप्रेक्ष, प्रतिसाद, भौतिकता, समानुभूती, स्वीकारर्हता, काल्पनिकता, बोल मनाचे, दोन खिडक्या, मूल्य व्यवस्था, माणसाची नैसर्गिकता आणि वृक्षवल्ली आम्हा सोयरे या महत्वाच्या पैलूंवर आधारीत विविध सत्र आणि कृतिकार्यक्रम अवलंबून असणार आहे. या कार्यशाळेत वरील विषयावर तरुण आणि अनुभवी मार्गदर्शकांच मार्गदर्शन मिळणार आहे. समाजातील वेगवेगळ्या ठिकाणी व्यक्त होणारी माणसं त्यांच्यासोबत संवाद करण्याची संधी इथे आहे… तसेच चित्रपट पाहणं आणि त्यावर चर्चा होणार आहे…. निसर्गासोबत माणसाचं असणारं नातं आणि माणसाची नैसर्गिकता हे उलगडायचा प्रयत्न करणार आहे. अशा या अभ्यासपूर्ण आणि दिशादर्शक कार्यशाळेत १८ ते २५ या वयोगटातील तरुण मित्र मंडळी सहभाग घेऊ शकता. ही कार्यशाळा म्हणजे एक वेगळा दृष्टिकोन आहे ते अनुभवण्यासाठी नक्की सहभागी व्हा.
‘युवा है हम, इंडिया’ (युथ प्लॅटफॉर्म) या फेसबुक/इंस्टाग्राम पेजला भेट द्या आणि आजच अर्जाची नोंदणी करा…
नाव नोंदणीसाठीची लिंक https://forms.gle/ZrdtshLSFeiqKtAi6