पुणे : महाराष्ट्र लोक विकास मंच, (मलोविम) या महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांच्या संघटनेमार्फत दिला जाणारा मानाचा पहिला राज्यस्तरीय, “जीवन गौरव पुरस्कार २०२२“, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व अफार्म संस्थेचे माजी कार्यकारी संचालक एम.एन. कोंढाळकर यांना जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोक विकास मंचचे अध्यक्ष, विश्वनाथ आण्णा तोडकर यांनी पुरस्काराची घोषणा नुकतीच पुणे येथे केली.
महाराष्ट्रातील असंख्य स्वयंसेवी संस्था, संस्थाचालक व कार्यकर्त्यांच्या क्षमतावर्धनासाठी तसेच त्यांच्या माध्यमातून, सर्वंकष ग्रामीण विकास व सामाजिक परिवर्तन यासाठी कोंढाळकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर ५० वर्षाहून अधिक काळ, आज वयाच्या ७५ व्या वर्षीही कार्य करीत आहेत. त्यामुळेच मलोविमने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
१० डिसेंबर २०२२ मध्ये इन्फंट इंडिया बीड येथे ११ वाजता यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या निमित्ताने कोंढाळकर यांचे महाराष्ट्र लोकविकास मंचचे उपाध्यक्ष भूमिपुत्र वाघ यांनी अभिनंदन केले आहे.