यवतमाळ : शिवशक्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंब येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे पर्यवेक्षक अतुल ठाकरे अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे जयाताई शेंडे सावली बहुउद्देशीय संस्था कळंब, प्रमुख पाहुणे मान्यवर विशाल राठोड दुसरे प्रमुख अतिथी म्हणून प्रविण राऊत हे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंचे विचार रुजवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बालविवाह मुक्त भारत, चांगला स्पर्श, वाईट स्पर्श, बाल लैंगिक अत्याचार, बाल अधिकार याविषयी जयाताई शेंडे सावली बहुउद्देशीय संस्था कळंबच्या संचालिका व सामाजिक कार्यकर्त्या यांनी मोलाचे मार्गदर्शन करून बालदिनाची शोभा वाढवली.
याप्रसंगी चारुलता गाढवे, राधिका साठे, अनुजा राऊत, जानवी पडोळे, ओझर शेख सक्षम जोड, सुहान वासे, जुडे युवराज अशोक काटेकर व गायत्री ढुमणे, पूर्वी मालखेडे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. १०ब ची हर्षदा निकोडे या विद्यार्थिनींने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रास्ताविक समिक्षा सुरदुसे व आभार जय राव या विद्यार्थ्यांने केले. कार्यक्रमाला विद्यार्थी व शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..