• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
Monday, December 22, 2025
NGO खबर
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
Monday, December 22, 2025
NGO खबर
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
Home NGO घडामोडी

विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा परभन्ना फाऊंडेशनतर्फे सेवाकार्य कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मान

NGO ख़बर by NGO ख़बर
November 16, 2022
in NGO घडामोडी
491
0
विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा परभन्ना फाऊंडेशनतर्फे सेवाकार्य कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मान
304
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : “सामाजिक, आर्थिक विकास होण्यासाठी चांगले शिक्षण घेणे गरजेचे आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात प्रगतीपथावर जायचे असेल, तर पारंपरिक शिक्षणाला व्यावसायिक शिक्षणाची जोड द्यायला हवी. ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी आपण प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा,” असे मत पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष प्रा. सुनील रेडेकर यांनी व्यक्त केले.

विविध क्षेत्रात सेवाकार्य करणाऱ्या सेवाव्रतींना परभन्ना फाउंडेशनच्या वतीने सेवाकार्य कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी पेठेतील पत्रकार भवनच्या कमिन्स सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला लोकशाही संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे पी. आर. सोनवणे, कर्वे सामाजिक संस्थेतील सीएसआर विभागाचे संचालक प्रा. डॉ. महेश ठाकूर, परभन्ना फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. गणेश चप्पलवार आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे (आरोग्य), शेतकरी युवानेता कैलास येजगे (कृषी), मधुबन कृषी पर्यटनाचे तृनीत कुथे (पर्यटन), पत्रकार रामचंद्र भंडारवार (पत्रकारिता), पोलिस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रशांत कांबळे (प्रशासन), उद्योजक तिलोकराज भालेराव (उद्योजकता), राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस भूपेंद्र मोरे (राजकारण), अभिनेता कपिल कांबळे (सांस्कृतिक), राईट टू लव्हचे के. अभिजित (सामाजिक), अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब चौगुले (शैक्षणिक), लेखक व पर्यावरण अभ्यासक बसवंत विठाबाई बाबाराव  (पर्यावरण) यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रा. सुनील रेडेकर म्हणाले, “पुणे विद्यार्थी गृहाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीब, गरजू व होतकरू मुलांना शिक्षण देऊन घडविले जाते. ११३ वर्षांचा हा ज्ञानदानाचा हा वारसा पुढे नेत आहोत. शिक्षणच आपल्याला तारणार असून, त्याला मूल्यांची व संस्कारांची जोड मिळाली, तर भारतातील तरुण पिढी आणखी प्रगती करू शकेल.” 
पी. आर. सोनावणे म्हणाले, “भारतीय संविधानाने आपल्याला न्याय व सन्मानाने जगण्याचे अधिकार दिले आहेत. त्याचबरोबर काही कर्तव्येही सांगितली आहेत. संविधान अबाधित ठेवण्याचे प्रत्येकाचे दायित्व आहे. या देशातील आदिवासींना, मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणून प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याची संधी संविधानाने दिली आहे.”

आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असलो, तरी आपल्यातील सामाजिक बंधुभाव जपायला हवा. समाजाच्या समस्या सोडवण्यात माझे काय योगदान असू शकेल, असा विचार करून प्रत्येकाने काम केल्यास अनेक प्रश्न सुटतील, असे प्रा. डॉ. महेश ठाकूर म्हणाले.

गणेश चप्पलवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. गणेश काळे यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन विजय गायकवाड यांनी केले.

Tags: #ngokhabar#ngonews#nonprofit#parbhannafoundation#pune#पुरस्कार#सेवाकार्य
Share122SendTweet76Share21
Previous Post

Bisleri International Partners with Connecting Dreams Foundation and Bharati College for Responsible Plastic Disposal and Recycling

Next Post

Truecaller and CyberPeace Foundation Come Together to Give Cyber Safety Lessons through Street Plays

Related Posts

म.न.पा.बालवाडी व अंगणवाडीमध्ये पोषणमहानिमित्त पौष्टिक पाककला स्पर्धा – पुणे मनपा, I.C.D.S., बजाज व युनायटेड वे दिल्लीचा उपक्रम
NGO घडामोडी

म.न.पा.बालवाडी व अंगणवाडीमध्ये पोषणमहानिमित्त पौष्टिक पाककला स्पर्धा – पुणे मनपा, I.C.D.S., बजाज व युनायटेड वे दिल्लीचा उपक्रम

September 26, 2025
कौशल्यम् प्रशिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ‘लाईटहाऊस’ च्या वतीने प्रमाणपत्र वितरण !
NGO घडामोडी

कौशल्यम् प्रशिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ‘लाईटहाऊस’ च्या वतीने प्रमाणपत्र वितरण !

August 21, 2025
सामाजिक बांधिलकीतून आनंदोत्सव-‘सखे सोबती’ व ‘Arise Vishwa Society’ यांचा उपक्रम 
NGO घडामोडी

सामाजिक बांधिलकीतून आनंदोत्सव-‘सखे सोबती’ व ‘Arise Vishwa Society’ यांचा उपक्रम 

August 21, 2025
पुण्यात अंगणवाडी सेविकांसाठी कार्यशाळा; बजाज फिनसर्व्ह आणि युनायटेड वे दिल्लीचा पुढाकार
NGO घडामोडी

पुण्यात अंगणवाडी सेविकांसाठी कार्यशाळा; बजाज फिनसर्व्ह आणि युनायटेड वे दिल्लीचा पुढाकार

February 23, 2025
व्हॅलेंटाईन डे निमित्त राईट टू लव्ह – प्रेमोत्सव उत्सहात साजरा; प्रेम, संघर्ष आणि अधिकाराच्या दशकाचा उत्सव!
NGO घडामोडी

व्हॅलेंटाईन डे निमित्त राईट टू लव्ह – प्रेमोत्सव उत्सहात साजरा; प्रेम, संघर्ष आणि अधिकाराच्या दशकाचा उत्सव!

February 17, 2025
शिक्षकांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी परिवर्तन व वोपा संस्थेच्या वतीने ‘मायका’ अॅपचे लोकार्पण
NGO घडामोडी

शिक्षकांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी परिवर्तन व वोपा संस्थेच्या वतीने ‘मायका’ अॅपचे लोकार्पण

January 25, 2025
Please login to join discussion

Recent News

म.न.पा.बालवाडी व अंगणवाडीमध्ये पोषणमहानिमित्त पौष्टिक पाककला स्पर्धा – पुणे मनपा, I.C.D.S., बजाज व युनायटेड वे दिल्लीचा उपक्रम

म.न.पा.बालवाडी व अंगणवाडीमध्ये पोषणमहानिमित्त पौष्टिक पाककला स्पर्धा – पुणे मनपा, I.C.D.S., बजाज व युनायटेड वे दिल्लीचा उपक्रम

September 26, 2025
कौशल्यम् प्रशिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ‘लाईटहाऊस’ च्या वतीने प्रमाणपत्र वितरण !

कौशल्यम् प्रशिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ‘लाईटहाऊस’ च्या वतीने प्रमाणपत्र वितरण !

August 21, 2025
सामाजिक बांधिलकीतून आनंदोत्सव-‘सखे सोबती’ व ‘Arise Vishwa Society’ यांचा उपक्रम 

सामाजिक बांधिलकीतून आनंदोत्सव-‘सखे सोबती’ व ‘Arise Vishwa Society’ यांचा उपक्रम 

August 21, 2025
पुण्यात अंगणवाडी सेविकांसाठी कार्यशाळा; बजाज फिनसर्व्ह आणि युनायटेड वे दिल्लीचा पुढाकार

पुण्यात अंगणवाडी सेविकांसाठी कार्यशाळा; बजाज फिनसर्व्ह आणि युनायटेड वे दिल्लीचा पुढाकार

February 23, 2025

Popular News

  • पुण्यात दोन दिवसीय राज्यस्तरीय बालविवाह प्रतिबंध कार्यशाळेचे आयोजन

    पुण्यात दोन दिवसीय राज्यस्तरीय बालविवाह प्रतिबंध कार्यशाळेचे आयोजन

    420 shares
    Share 168 Tweet 105
  • थायलेसिमियाच्या रुग्णांसाठी महाराष्ट्रातले पहिले मोफत खाजगी ब्लड ट्रान्सफ्युजन सेंटर पुण्यात सुरु

    359 shares
    Share 144 Tweet 90
  • सौभाग्यलंकार सवाष्णची मक्तेदारी नाही. आटपाडीच्या लताताई बोराडेंचे मत

    358 shares
    Share 143 Tweet 90
  • महाराष्ट्रातील शाळांचे व्यवस्थापन अदानी फाउंडेशनकडे हस्तांतरित: शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

    338 shares
    Share 135 Tweet 85
  • विधवा प्रथा निर्मूलनाचा ठराव करणाऱ्या ग्राम पंचायतींना अंनिसच्या वतीने सामाजिक प्रेरणा पुरस्कार जाहीर

    333 shares
    Share 133 Tweet 83

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (169)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (119)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

©2021- 2024 NGO Khabar. All Rights Reserved

Navigate Site

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Translate >>
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

©2021- 2024 NGO Khabar. All Rights Reserved