रायगड – माणगांव : ह्युमॅनिटी युनायटेड फेडरेशन व पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील माणगांव पोलीस ठाणे येथे मासिक पाळीच्या स्वच्छता मुद्द्यावर मार्गदर्शन करण्यात आले.
मासिक पाळीच्या संदर्भात नेहमीच लाज, संकोच बाळगल्याने महिला व युवतींना अनेक गंभीर आणि इतर समस्याना तोंड द्यावे लागते. मासिक पाळीतील मनातील लज्जा, संकोचची जागा गर्व आणि आनंदात बदलण्यासाठी ह्युमॅनिटी युनायटेड फेडरेशन द्वारा अभियान सुरू केले आहे.
माणगांव पोलीस नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. अनेक सामाजिक उपक्रम माणगांव पोलिसांतर्फे राबविले जातात. असाच एक स्तुत्य उपक्रम माणगांव पोलीसांनी राबविला असून आणि माणगांव पोलीस ठाणे येथे सॅनिटरी नॅपकिन मशीन बविण्यात आले आहे.