पुणे : जिल्हाधिकारी कार्यालय ( निवडणूक शाखा ) पुणे व २१५ कसबा पेठ, विधानसभा मतदार संघ, जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध कक्ष व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने, सामाजिक वंचित घटकांचे विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामधे मंथन फाउंडेशन सोबत इतर समाजिक संस्था यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
मंथन फाउंडेशन वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी बुधवार पेठ रेड लाइट एरिया येथे काम करते. मंथन फाउंडेशन ने याआधी महिलांसाठी, आधार कार्ड, राशन कार्ड साठी शिबिरे आयोजित केली आहेत. ज्या महिला अजूनही मतदानाच्या अधिकारापासून वंचित आहे त्यांच्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
मतदार नोंदणी शिबिराचे उद्घाटन प्रमुख अतिथी माननीय डॉ. राजेश देशमुख– जिल्हाधिकारी पुणे यांच्या हस्ते झाले. त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले. सरकार व सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने समाजात चांगले काम उभे राहत आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच सामाजिक संस्था यांनी खूप छान नियोजन केले व उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचे कौतुक व सन्मान केला.
यावेळी उपस्थित मान्यवर आरती भोसले (उपजिल्हा निवडणूक अधिकारी), संतोष देशमुख (मतदार नोंदणी अधिकारी) व राधिका हावळ बारटक्के (तहसीलदार पुणे शहर), अश्विनी कांबळे (जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी) तसेच सुधीर सरवदे (जिल्हा कार्यक्रम अधिकारी-जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध कक्ष ), शीतल शेंडे जिल्हा पर्यवेक्षक, दीपक निकम ( महाराष्ट्र राज्य Prevention Specialist FHI 360), अमर चव्हाण, अल्ताफ मुजावर व सामाजिक संस्था रिलीफ फाउंडेशन, जे. पी. एस. डी.पी. व अलका फाउंडेशनचे अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आभार प्रदर्शन आशा भट्ट अध्यक्षा मंथन फाउंडेशन यांनी केले. अनेक महिलांनी शिबिराचा लाभ घेतला.