नागपूर : सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय यांच्या निर्देशानुसार स्वच्छता पखवाडा म्हणजे सडक सुरक्षा सप्ताह ११ ते १७ जानेवारी पर्यंत संपूर्ण भारतात राबिवला जात आहे. त्याच अनुषंगाने हितेंजू बहुद्देशीय संस्था तुमसर, जमन भाई बहुद्देशीय संस्था घानोड, सुलोचना महिला बहुद्देशीय संस्था नागपूर तसेच कल्पतरू बहुउद्देशी संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नामदेवराव हायस्कूल घानोड येथे “सडक सुरक्षा सप्ताह” निमित्त ट्रॅफिक नियमा संदर्भात मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय खोकले यांनी विद्यार्थ्यांना ट्राफिक नियमाच्या अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, सडक सुरक्षा काळाची गरज असून भंडारा जिल्ह्यामध्ये साकोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. त्यात दारू पिऊन गाडी चालवणे, हेल्मेटचा वापर नाही केल्यामुळे, वाहनाच्या अतिरिक्त वेग, व ट्रॅफिक नियमाच्या पालन न करणे यापुढे होणारे अपघात या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
हितेंजू बहुद्देशीय संस्थेचे संचालक धमलेश सांगोडे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, पायी चालताना रस्त्याच्या उजव्या बाजूला चालावे. जेणेकरून समोरून येणारे वाहन आपल्याला पाहता येईल व जर ते आपल्या अंगावर आले तर आपण बाजूला सरकू शकतो व अपघात टाळता येऊ शकते. पायी चालताना रस्त्याच्या उजव्या बाजूला चालायची सवय लावणे हे खूप आवश्यक आहे. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना “Walk On Right”हा स्लोगन दिला.
ग्रामपंचायत घानोडच्या सरपंच श्रीमती आशाताई लाडे यांनी विद्यार्थ्यांना सडक सुरक्षा संदर्भात मार्गदर्शन केले. नामदेवराव हायस्कूल चे मुख्याध्यापक एन. एस. रामटेके सर यांनी विद्यार्थी हे उद्याचे भविष्य असून त्यांनी अभ्यासातून ट्राफिक नियमाचे धडे घ्यावे असे बोधवाक्य दिले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जमन भाई बहुउद्देशी संस्थेचे संस्थापक किशोरजी जनबंधू, अश्विनी भोयर ट्राफिक पोलीस, आर बी देशपांडे सर, डीएम मानकर सर, टी एन मस्के सर, टी डी जांभुळकर सर, टीव्ही भुरे सर, उईके सर, मर्षकोल्हे सर, आशिष सहारे सर, किशोर बडोळे सर, बुद्धशील मेश्राम, कादंबरी लाडे मॅडम, पिके कानेकर व सर्व विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.