पुणे : मुलांच्या शिक्षणाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांना बालमजुरी किंवा अत्याचाराच्या परिस्थितीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी १९८० पासून इंडिया स्पॉन्सरशिप कमिटी, पुणे येथे विविध कार्यक्रम राबवत आहे . मुलांच्या भवितव्याचा विचार करत असताना पालकांबरोबर काम करणे गरजेचे असते. संस्था काम करत असलेल्या बहुतांशी वस्त्यांमध्ये आर्थिक दृष्ट्या अक्षम कुटुंबे राहत आहेत. महिलांच्या रोजगाराचा देखील प्रश्न नेहमीच भेडसावत होता. या सर्व बाबी लक्षात घेऊन, HDFC securities कंपनीच्या आर्थिक मदतीने इंडिया स्पॉन्सरशिप कमिटी गेल्या तीन वर्षांपासून सक्षम कार्यक्रम राबवत आहे.
सक्षम हा एक सशक्तीकरण उपक्रम आहे जो तरुण प्रौढांना त्यांचे कौशल्ये ओळखण्यासाठी, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देत आहे. या कार्यक्रमामुळे असुरक्षित समुदायातील तरुण मुली आणि महिलांना स्वतंत्रपणे आणि आत्मविश्वासाने रोजगार प्राप्त करण्याचे साधन प्राप्त करून देत आहे .
याच मेहनतीचं फलित म्हणून २४ जानेवारी रोजी सक्षमच्या पहिल्या एम्पोरियम चे उद्घाटन संस्थेचे पदाधिकारी उदय शहा, श्रीमती मेधा ओक आणि HDFC securities चे चीफ ग्रोथ ऑफिसर मुफद्दलाल माचीसवाला यांच्या उपस्थितीत करण्यात आला. ISC सक्षम एम्पोरियम सोमवार ते शुक्रवार दुपारी १२ ते रात्री ८ पर्यंत ग्राहकासाठी तसेच भेट देणाऱ्यांसाठी खुले राहणार आहे.