पुणे : सेफ किड्स फाऊंडेशन येथे वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक या पदावर कार्यरत असणारे महादेव धोंडीराम जाधव यांनी इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली येथून समाज कार्य या विषयात पी. एच. डी. प्राप्त केली. त्यांनी “अव्हेइलीबिलीटी अँड एक्सेसिबिलीटी ऑफ शेल्टर्स फॉर अर्बन हाऊसलेस-अ स्टडी ऑफ सिलेक्टेड शेल्टर्स इन मेजर सिटीज ऑफ इंडिया” या विषयावर प्रबंध सादर केला.
इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीच्या समाज कार्य या विभागाच्या प्रमुख प्रो. रोज नेम्बियाक्किम यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव यांनी हे संशोधन पूर्ण केले. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले असून त्यांनी या पूर्वी एम ए, एम एस डब्ल्यू, एम फिल या पदव्या संपादन केल्या आहेत. मागील १५ वर्षापासून ते समाज कार्य या क्षेत्रात कार्यरत असून त्यांना भारती विद्यापीठाचे निवृत्त प्रो. विजय कुलकर्णी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.
भारतामध्ये १७ लाखाहून अधिक लोक हे बेघर म्हणून रस्त्यावर वास्तव्य करून रहात असून दिवसोगणित हा आकडा वाढताना दिसत आहे. अशा बेघर लोकांसाठी दीनदयाळ अंत्योदय योजना- नॅशनल अर्बन लाइवलिहूड मिशन अंतर्गत निवारा देण्याची सुविधा करण्यात आली होती. अशा निवारा केंद्रांची सद्याची परिस्थिती काय आहे, त्यांच्या लाभार्थ्यांना या निवारा केंद्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे व काही बेघर लोक या निवारा केंद्राचा लाभ करून का घेत नाहीत अशा विषयी हे संशोधन होते. हा अभ्यास मुंबई आणि लखनऊ या शहरामध्ये करण्यात आला.