पुणे : मासिक पाळी दिनानिमित्त वॉश अलायन्स महाराष्ट्र यांच्या वतीने ‘जागतिक मासिक पाळी दिवस’ पत्रकार भवन पुणे येथे साजरा करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत दिलमेहेर भोला (अध्यक्ष, सी.वाय.डी.ए. संस्था पुणे) यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर कु. कुणाल रसाळ आणि कुमारी चैत्राली परदेशी या किशोरवयीन मुलांनी मासिक पाळी विषयी त्यांचे मनोगत व्यक्त केले. “सुरुवातीला माझं घर मासिक पाळीबरोबर येणाऱ्या अंधश्रद्धानी भरलेलं होतं, मासिक पाळीच्या आरोग्य शिक्षणामुळे मी वयाच्या १४ व्या वर्षी माझ्या घरच्यांना ही प्रक्रिया स्वीकारण्यास भाग पाडलं. मी माझ्या आई आणि बहिणीचे पॅड विकत घेण्यासाठी दुकानात जातो आणि मूड बदलल्यावर त्यांचे समुपदेशन करतो, असे मनोगत कु. आयान शेखने व्यक्त केले.
या कार्यक्रमामध्ये पर्यावरण पूरक पुन्हा वापरण्यायोग्य सॅनिटरी पॅड याचे सादरीकरण तसेच प्रमुख पाहुण्याच्या हस्ते पॅड चे उद्घाटन करण्यात आले. जोत्स्ना बहिरट ( मुख्य कार्यकारी अधिकारी, युथ एड फाउंडेशन, पुणे) यांनी पुन्हा वापरण्यायोग्य सॅनिटोरी पॅड याबद्दल माहिती सादर केली. त्याच बरोबर दैनंदिन वापरात हे पॅड कसे उपयुक्त आहे, याची माहिती त्यांनी स्वअनुभवाने दिली. पर्यावरण पूरक पुन्हा वापरण्यायोग्य सॅनिटोरी पॅड तयार करण्याचे काम महिलांमार्फत केले जाते. येरवड्यातील.झोपडपट्ट्यांमधील महिलांच्या एका गटाने ज्यांनासुरुवातीला घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती त्यांनी 10 STITCH STUDIO मार्फत पुन्हावापरण्यायोग्य कापडी सॅनिटरी पॅड बनवून सॅनिटरी पॅडमधील अंतःस्रावी रसायने आणि प्लास्टिकच्या जागतिक पातळीवरील सार्वजनिक आरोग्याच्या चिंतेचा सामना करण्यासाठी सीवायडीएशी भागीदारीकेली आहे. केमिकल घटकांपासून हानिकारक तयार होणाऱ्या पॅड ला हे एक चांगला पर्याय म्हणून पाहू शकतो.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने “मासिक पाळी व्यवस्थापन” या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते, चर्चासत्रास संदीप तेंडोलकर (राज्य सल्लागार, पाणी स्वच्छता व आरोग्य, युनिसेफ मुंबई), डॉ.दिप्ती खांबेटे (स्टोन सूप तज्ञ), नीरज कुमार (रोटरी क्लब प्रतिनिधी), सुरेखा लेंभे (शिक्षिका- नूतन बाल विकास मंदिर ), कु. रुची -किशोरवायीन प्रतिनिधी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या चर्चासत्रामद्धे मासिक पाळी संबधित अनुभव कथन आणि पुढे या संबधित काय करण्याची गरज आहे, यावरती प्रकाश टाकण्यात आला. मासिक पाळी आल्यावर काय करावे याचे सैद्धांतिक ज्ञान मला होते, पण त्यासोबत येणाऱ्या भीतीला सामोरे जाण्याची माझी तयारी नव्हती. माझ्या वर्गमित्राच्या, घरच्यांना असं वाटतं की मासिक पाळी सुरू झाल्याने बलात्काराची शक्यता वाढते आणि म्हणूनच त्या वेळी त्यांचं लग्न लावून दिलं जातं,” अशी खंत किशोरवयीन प्रतिनिधी कुमारी रुची पंडित हिने व्यक्त केली.
चर्चा सत्रानंतर “पर्यावरण पूरक सॅनिटरी पॅड व्यवस्थापन प्रक्रिया” या स्पर्धेच्या बाबतची माहिती प्रवीण जाधव (सी.वाय.डी.ए. संस्था पुणे) यांनी दिली. त्यानंतर विजेत्यांना/ सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या संदीप तेंडोलकर (राज्य सल्लागार, पाणी स्वच्छता व आरोग्य, युनिसेफ मुंबई) यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणामध्ये व्यक्त केली की, मासिक पाळी संदर्भात ज्या काही धार्मिक अंधश्रद्धा आहेत ते नष्ट होणे गरजेचे आहे. मासिक पाळी स्वच्छता यावरती वादझाला तरी चालेल, संवाद झाला पाहिजे #wearecommitedto# हे घोषवाक्य सर्वात प्रभावी होते आणि प्रेक्षकांवर त्याचा प्रचंड प्रभाव पडला.
सी.वाय.डी.ए. संस्था यांच्या वतीने विद्यार्थांनी “मासिक पाळी आणि समाजाचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण” या विषयावर पथनाट्य सादर केले. मासिक पाळीच्या वेदना आणि हार्मोनल बदलाच्या तीव्रतेवर थेट परिणाम होतो त्यामुळे येरवड्यातील झोपडपट्ट्यांमधील सीवायडीएच्या जागरूक मुलाची नवी पिढी मुलींना समाजाकडून जाणवणाऱ्या अपराधीपणाचा आणि लाजेचा तसेच आपल्या बहिणी आई आणि मित्रांचे जीवन सुकर करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. समजातून मिळणारी वागणूक जसे की विलगीकरणात राहणे, ‘अशुद्धता’ पसरू नये म्हणून कुटुंबातील सदस्यांनी त्यांना एकाच ठिकाणी बसवणे अशा प्रकारच्या कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, हे या कार्यक्रमादरम्यान मुलींनी पथनाट्याच्या माध्यमातून जागृती केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी आनुश्री जाधव आणि कु. अभिषेक वाणखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल शेवाळे (सी.वाय.डी.ए. संस्था पुणे) यांनी केले. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वी करण्याकरिता वॉश अलायन्स महाराष्ट्र, यूनिसेफ, त्याचबरोबर सहभागी स्पर्धकांचे मोलाचे सहकार्य प्राप्त झाले.