कोल्हापूर, कोरोची : “माणसातील राजा आणि राजातील माणूस अनुभवायचा असेल तर लोकराजा शाहू यांचे चरित्र व कार्य समजून घेण्याची गरज आहे.” असे मत शाहू चरित्राचे ज्येष्ठ अभ्यासक संभाजीराव मोहिते यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकराजा शाहू महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. जवाहर वाचनालय, कोरोची आणि संविधान परिवार यांचेवतीने आयोजित व्याख्यानात शाहू महाराजांच्या विषयी पसरवलेल्या गैरसमज तथा अफवांचा समाचार घेतला. लोककल्याणकारी राजाने त्या काळात रोजगार हमी योजना ते सक्तीचे मोफत शिक्षणापर्यंत कामे केली. अस्पृश्यता दूर करणेसाठी सामाजिक न्यायाचे तत्व प्रस्थापित करत आरक्षण दिले. दुष्काळ, प्लेगसारख्या साथींचा ताकदीने मुकाबला करण्यासाठी उपाययोजना करणारा राजा आताच्या नेत्यांनी समजून घ्यावा लागेल.
स्वागत अविनाश कुरुंदवाडे यांनी केले. प्रास्ताविक नरसगोंड पाटील यांनी केले तर सुनिल स्वामी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.
यावेळी अशोक केसरकर, संजीवनी चिंगळे, देवदत्त कुंभार, सचिन पाटोळे, अशोक वरुटे, नम्रता कांबळे, शरद वास्कर, आदित्य धनवडे, साद चांदकोटी, संजय रेंदाळकर आदिंसह कोरोचीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन रविंद्र पडवळे यांनी केले. शिवगोंड पाटील यांनी आभार मानले.