पुणे (पिंपरी चिंचवड) : पिंपरी चिंचवड एज्युकेशन सोसायटी व पिकअपबीझ सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व शाखेच्या पदवीधर उमेदवारांकरिता “Any graduate can become a software engineer” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह पिंपरी येथे हा कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी बीव्हीजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर दत्ता गायकवाड, पिकपबिझ संस्थेचे अमजद खान यांनी उमेदवारांना मोलाचे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमांमध्ये सॉफ्टवेअर स्किलच्या विविध कोर्सेस बद्दल माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजक, पिंपरी चिंचवड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अकील भाई मुजावर यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
सदर कार्यक्रमाकरिता महाराष्ट्र मायनॉरिटी एनजीओ फोरम चे संस्थापक अध्यक्ष जाकीर शिकलगार, मौलाना अब्दुल गफ्फार, धम्मराज साळवे, व्ही एम कबीर, नियाज देसाई, रुहिनाज शेख, हाजरा कबीर, रौफ कुरैशी, वाहिद कुरैशी खालीद मुजावर, फैय्याज शेख, इरशाद कुरैशी व अनेक पदवीधर उमेदवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अब्दुल सलाम इनामदार यांनी केले व संस्थेचे सचिव गुलाम मोहम्मद शेख यांनी आभार व्यक्त केले.