परभणी : मणिपूर येथे चालू असलेल्या हिंसाचाराच्या तथा कुकी समाजातील आदिवासी महिलांची निवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी मणिपूरचे मुख्यमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे निवेदन मानव मुक्ती मिशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याद्वारे माहमहिम राष्ट्रपती यांना देण्यात आले.
मणिपूर राज्यात गेले अनेक महिने हिंसाचार सुरु आहे. स्थानिक पोलीस यंत्रणेला न जुमानता सशस्त्र जमाव आदिवासी, कुकी समुदायावर हल्ले करत आहे. २०० पेक्षा जास्त कुकी समुदयातील महिला व पुरुषांची हत्या करुन त्यांना गाडले गेले आहे. राज्यातील नुकतीच एक संतापजनक घटना देशभर पसरली आहे. ज्यात तीन कुकी समुदायातील महिलांना निवस्त्र करुन त्यांची जमावाकडून धिंड काढून अवहेलना केली गेली. मणिपुरच्या मुख्यमंत्र्याना याबद्दल जराही संवेदना असेल तर त्यांनी त्वरीत राजीनामा दयावा व जनसमुदयाची माफी मागावी. कुकी आदिवासी समुदायाला गावोगाव केंद्र सरकारने संरक्षण दयावे. आदिवासी समुदायाच्या झालेल्या नासधुसी बद्दल त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. मणीपुर सरकारचा तिव्र शब्दात निषेध करत अशा विविध मागण्या घेऊन हे निवेदन देण्यात आले.
यावेळी नितीन सावंत, अमोल लांडगे, अजित कदम, वैभव शेटे, रामप्रसाद अंभुरे, नवनाथ महाराज, संतोष धोतरे, चैतन्य बोबडे, जयपाल धाबे, भगवान कोकाटे, बाळू बोडखे, ज्ञानेश्वर कोकाटे, बळीराम घोगरे ओमकार मार्कड, अजित कदम, एन जी खंदारे, उपस्थित होते. सदर निवेदनावर वरील कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरी आहेत.