• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
Monday, May 11, 2026
NGO खबर
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
Monday, May 11, 2026
NGO खबर
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
Home NGO घडामोडी

सांगली जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ सुरू करण्याची अंनिसची मागणी

NGO ख़बर by NGO ख़बर
August 14, 2024
in NGO घडामोडी
499
0
A7bd05bb Aa29 405a Ba6c 0ebd043c5db4 1.jpg
309
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सांगली : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्रात २०१३ साली जादूटोणाविरोधी कायदा लागू झाला आहे. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्याच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्थापन करणेबाबत पोलीस अधीक्षकांना नुकतेच परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

पोलीस महासंचालकांच्या या परिपपत्रकानुसार सांगली जिल्ह्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ सुरू करावेत अशी मागणी आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिष्टमंडळाने पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) अरविंद बोडखे यांची भेट घेऊन केली. यावेळी अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात, डॉ. संजय निटवे, फारुख गवंडी, जगदीश काबरे, सुनील भिंगे, नानासो पिसे, आशा धनाले, त्रिशला शहा उपस्थित होते.

यावेळी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात अंनिसने म्हटले आहे की,महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जादू‌टोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणेसाठी ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्थापन करावेत असा आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाने १९ जुलै २०२४ रोजी काढला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महाराष्ट्र पोलिसांच्या या आदेशाचे स्वागत केले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये स्थापन करणे हे महाराष्ट्र पोलिसांचे आश्वासक पाऊल आहे. यामुळे जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होईल. हे कक्ष आपल्या सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला स्थापन करावेत.

राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांच्या सहीने असलेल्या आदेशात अन्वये, ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३’ च्या कलम ५ (१) अन्वये, महाराष्ट्र शासनास प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन, महाराष्ट्र शासन, सदर अधिनियमातील कलम ५ (२) मध्ये उद्धृत केलेली कर्तव्ये पार पाडण्याकरीता पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात सहाय्यक आयुक्त (गुन्हे), तसेच पोलीस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रात पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा) यांची दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याच्या तसेच,’महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत अधिनियम २०१३’ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक कक्ष स्थापन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.’

जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस स्टेशनला कक्ष स्थापन करणार अशी जाहिराती महाराष्ट्र शासनाने मागील आठवड्यात प्रसिद्ध केली आहे.

जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्याच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्थापन करणेबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची गेल्या अनेक दिवसांपासूनची एक मागणी या निमित्ताने पूर्ण झाली आहे. या कायद्याचे प्रशिक्षण पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना देण्यास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मदत करेल.

पोलीस प्रशासनाने विनंती हे कक्ष सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला स्थापन करावेत तसेच त्यांची माहिती जनतेला जाहीर करावी, जेणेकरून पीडित लोक आपली तक्रार निर्भयपणे या कक्षाकडे घेऊन येतील.

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतिदिना (२० ऑगस्ट) पर्यंत ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनला स्थापन झाले तर डॉ. दाभोलकरांना हे एक कृतिशील अभिवादन ठरेल अशी अपेक्षाही अंधश्रद्धा निर्मूलन समितीने व्यक्त केली आहे.

Share124SendTweet77Share22
Previous Post

छत्रपती संभाजीनगरमधील प्रेमविवाहातील हत्येच्या प्रकरणातील कुटुंबाला ‘राईट टू लव्ह’ची भेट !

Next Post

आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ‘जाणीव फाऊंडेशन’कडून शैक्षणिक व संगणक साहित्य वाटप

Related Posts

Markup 10461.jpg
NGO घडामोडी

म.न.पा.बालवाडी व अंगणवाडीमध्ये पोषणमहानिमित्त पौष्टिक पाककला स्पर्धा – पुणे मनपा, I.C.D.S., बजाज व युनायटेड वे दिल्लीचा उपक्रम

September 26, 2025
D2ea60b8 7f2c 4ebc a200 d727b03293f4.jpg
NGO घडामोडी

कौशल्यम् प्रशिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ‘लाईटहाऊस’ च्या वतीने प्रमाणपत्र वितरण !

August 21, 2025
E5f0b152 c328 4097 9273 a80f7ecfa93f.jpg
NGO घडामोडी

सामाजिक बांधिलकीतून आनंदोत्सव-‘सखे सोबती’ व ‘Arise Vishwa Society’ यांचा उपक्रम 

August 21, 2025
Bb54211e C986 471b A3e0 981daf47dc3e 1.jpg
NGO घडामोडी

पुण्यात अंगणवाडी सेविकांसाठी कार्यशाळा; बजाज फिनसर्व्ह आणि युनायटेड वे दिल्लीचा पुढाकार

February 23, 2025
Img 3264 1.jpg
NGO घडामोडी

व्हॅलेंटाईन डे निमित्त राईट टू लव्ह – प्रेमोत्सव उत्सहात साजरा; प्रेम, संघर्ष आणि अधिकाराच्या दशकाचा उत्सव!

February 17, 2025
67b5b5f2 47b8 403b 9058 6c8f02f3a1ab 1.jpg
NGO घडामोडी

शिक्षकांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी परिवर्तन व वोपा संस्थेच्या वतीने ‘मायका’ अॅपचे लोकार्पण

January 25, 2025

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (169)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (116)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

©2021- 2024 NGO Khabar. All Rights Reserved

Navigate Site

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

©2021- 2024 NGO Khabar. All Rights Reserved

Go to mobile version