मुंबई : भाकर फाउंडेशनने बाल अधिकार सप्ताहाचे आयोजन केले असून यानिमित्ताने पहिल्या दिवशी बालकांसाठी बाल दिनरंगोत्सव आयोजित करण्यात आला.
बाल सभेच्या भगतसिंग नगर १, २ आणि गोरेगाव पश्चिम येथील मुलांसाठी पेपर प्लेट पेंटिंग व पेपर ग्लास पेंटिंगचेआयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व मुलांनी खेळ, गाणी, धमाल, मस्ती केली. संस्थेने मुलांसोबत केक कापून वसर्व मुलांना गिफ्ट वाटुन बाल दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात भाकर फाऊंडेशन संस्थापक दिपक सोनावणे, साहिल पवार, विद्या कांबळे, जाहिदा शेख, संगिता ताईबोबाटे, आकाश क्षिरसागर, कुणाल शिंदे, मयुर जाधव, अजय भालेराव, करूना सोनावळे, श्रवण खंडागळे, उरवी विरा वबाल सभेचे सदस्य सहभागी होते.







