भाकर फाऊंडेशन आयोजित बाल अधिकार सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी गोरेगाव येथील विश्वशांती बुद्ध विहार येथे बालअधिकार संरक्षण माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात विधायक भारती संस्थेचे सामाजिक कार्यकर्त्या अंकिता शिवगण व भाकर फाऊंडेशनचे दिपक सोनावणे यांनी पालकांना बाल अधिकार व संरक्षण, बाल लैंगिक शोषण या विषयावर मार्गदर्शन केले.
विधायक भारती संस्थेने तयार केलेल्या “बाल अधिकार माहिती पत्रक” व “Covid आणि माझी जबाबदारी” हे माहितीपत्रक वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात विद्या कांबळे, चाऊस शेख, सेजल शिंदे, आकाश क्षिरसागर, संगिता बोबाटे, साहिल पवार, मयुर जाधव, अजय भालेराव व पालकवर्ग उपस्थित होते.