नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका आणि एनवायरनमेंट लाईफ यांच्या संयुक्त विद्यमानाने सारसोळे येथील खाडी किनारी मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबवून “प्लास्टिक बंदी” व “माझी वसुंधरा” ची शपथ घेण्यात आली.
यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाचे उप आयुक्त बाबासाहेब राजळे, एनवायरमेंट लाईफचे धर्मेश बराई, स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे, स्वच्छता निरीक्षक अजित तांडेल, विजय नाईक, इन्व्हरमेंट लाईफचे इतर सदस्य, नागरिक व साफ सफाई कामगार उपस्थित होते.