पुणे-शिरूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शिरूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या वतीने दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेत २० तारखेला उत्तम कांबळे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेली लोकशाही या विषयावर मार्गदर्शन केले तर २१ एप्रिल रोजी आनंद शितोळे यांनी संविधानाने दिलेली मूलभूत अधिकार व कर्तव्य यावर नागरिकांना मार्गदर्शन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाचे हे पहिलेच वर्ष होते. या पहिल्याच वर्षी मिळालेल्या प्रतिसादामुळे आम्ही या वर्षभरातही व्याख्यानमाला किंवा व्याख्याने आयोजित करण्याचे प्रयत्न करणार आहोत. शिरूर तालुक्यातील सर्व सुजन नागरिकांनी या दोन दिवसाच्या व्याख्यानमालेला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवल्यामुळे या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. अशा शब्दात आयॊजक ऍड. वैभव चौधरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.. तसेच अशाच प्रकारे यापुढेही आंबेडकर विचार मंचाने आयोजित केलेल्या व्याख्यानमाला किंवा एखाद्या कार्यक्रमाला अशाच प्रकारचा उदंड प्रतिसाद द्यावा अशी विनंती शिरूर मधील नागरिकांना त्यांनी यावेळी केली.